-
With the inspiration of Honourable President of IBSS Shri. Yogendraji Gode Saheb, Secretary Ms. Tanvi Gode Madam and Under the guidance of Principal Dr. P. K. Deshmukh sir As a part of curriculum activities, one day Hospital visit to Sub-District Hospital, Malkapur was organized for D. Pharm students on 30 Nov 2024. Around 10:30 Am we reached Government Hospital Malkapur. As a Hospital representative Mrs. Anagha Lokhande offered a warm welcome to the students and gives the details about different Departments in the hospital like OPD, IPD , Pharmacy, clinical pathology, AIDS and TB Control, Vaccine, Eye Dept., Accident and Emergency care, Gynecology and Maternity unit etc. During this visit students get information about the procedure undertaken in the Hospital, the facilities available in the Hospital and about the equipments used for diagnose of diseases and the special treatment in the hospital, this visit is a memorable and useful one. This Hospital Visit activity was planned and organized successfully by Prof. R. A. Darakhe (HOD) and Prof. R. A.Jangle, Prof. V. M. Patil, Prof. V. S. Padghan.
-
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब, सचिव कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत उपजिल्हा रुग्णालय मलकापूरच्या आवारामध्ये जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली मध्ये उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथील रेड रिबन क्लब अधिकारी अनघा लोखंडे व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी एच आय व्ही एड्स या विषयावर जनजागृती केली त्यामध्ये एड्स होण्याची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय तसेच समाजामध्ये एड्स या आजाराबद्दल असलेले गैरसमज विषयावर प्रकाश टाकला. पदविका अभ्यासक्रमाचे विभाग प्रमुख प्रा.राहुल दराखे, प्रा.विशाल पडघान, प्रा.वैभव पाटिल, प्रा.रोहिणी जंगले यांनी सदर रॅलीचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
-
We are thrilled to announce that Our institute has been awarded with the 'Award of Excellence' by the Maharashtra State Pharmacy Council (MSPC), in the Colleges from Amaravati Zone category. We are thankful to all office bearers of MSPC for appreciating our efforts for celebration of 'World Pharmacist Day 2024.' We are grateful to our visionary leadership Hon. President of IBSS, Buldana Shree. Yogendraji Gode Sir and Hon. Secretory Ms. Tanvi Gode Ma'am for their motivation and unconditional support in every institutional activity. We are also thankful to all stakeholders of DRGCOP, Malkapur for their contribution in the development of our Institute.
-
डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत संविधान दिन साजरा करण्याकरता महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला मुख्य अतिथी आणि व्याख्याते डॉ.रमेश इंगोले, राज्यशास्त्र विभाग प्रमुख जनता कला व वाणिज्य महाविद्यालय मलकापूर लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख यांनी भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथी यांच्या परिचय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अनंत तीतरे यांनी करून दिला. यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व व्याख्याते डॉ.रमेश इंगोले यांनी संविधान निर्मिती मागच्या संपूर्ण घटनांचा उहापोह केला व संविधानाने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्क आणि कर्तव्य याची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क तसेच कर्तव्य याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी देशाचा सुजाण नागरिक म्हणून देश हितासाठी व देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमांमध्ये संविधानाची उद्देशिका वाचन प्राध्यापक मंगेश देवकर यांनी केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शैक्षणिक प्रशासक डॉ.वैभव आढाव तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्वयंसेविका अंजली तेलंग व प्रतीक्षा सुरळकर यांनी केले तर छायाचित्रण राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक करण राजपूत व दर्शन पाटील यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मुकेश बाभुळकर यांनी केले व 26/11 च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलातील अधिकारी व पोलीस अधिकारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना प्राध्यापक अनंत तीतरे व प्राध्यापक साक्षी पाटील आणि सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी केले.
Recent Comments